नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘अल कायदा’ने चित्रफीत प्रसारित करून दिल्ली, बंगळूर, कोलकाता सारख्या महानगरात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त असल्याने अन्य शहरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा इशारा ‘अल कायदा’ने दिला आहे.
अल कायदा’च्या चित्रफितीनंतर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. संशयास्पद हालचालीवर पोलिसांची करडी नजर असून घातपाताचा कट उधळून लावण्यास मुंबई पोलिस सज्ज झाली आहे.सोशल मीडियांवरील संशयास्पद संदेशावरही पोलिसांची नजर आहे. रेल्वे, विमानतळासह गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. त्यामुळे तटरक्षक दलानेही सागरी भागातील बंदोबस्त वाढविला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews